Advertisement
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण
कराड : केज तालुक्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशीसंबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे. त्याआधी कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान एसआयटीचे अधिकारी वाल्मिक कराडला घेऊन मोक्का कोर्टात गेले आहेत. हत्येचा कट रचल्याने त्याच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे.
याआधी हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे.
दरम्यान, वाल्मिकला सीआयडीने ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच वाल्मिकीच्या कोठडीवर आज कोर्टामध्ये युक्तिवाद झाला. कराडची कोठडी आज संपत असल्याने त्याला केज कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी वकिलांनी कराडची आणखी 10 दिवस कोठडी द्यावी, अशी मागणी केली तर कराडच्या वकिलांनी सरकारी वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचं कोर्टात पाहायला मिळालं.
