#

Advertisement

Monday, January 13, 2025, January 13, 2025 WIB
Last Updated 2025-01-13T17:13:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याचा ठराव

Advertisement

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदाचा ठराव सर्वानुमते मंजूर

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतची विनंती करण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत एक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करावी, असा ठराव शिवसेनेच्या आजच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची विनंती करण्याचं निश्चित करण्यात आलं. शिवसेनेचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नुकतंच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालं हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली होती.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. शिवसेनेच्या विचारधारेला काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. आम्ही 45 वर्ष मातोश्री जवळून पाहिली. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचाराला हरताळ फासलं, लाचारी पत्कारून उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले. त्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी आणि भाषणाचा अजिबात अधिकार नाही.