Advertisement
बहुजन रयत परिषद प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमल ढोबळे-साळुंखे यांचे प्रतिपादन
जयसिंगपूर : सध्याच्या राजकाणाची दशा पहता अशा राजकारण्यांमुळे देश चुकीच्या दिशेने जाणार तर नाही ना, राजकारणात चांगल्या व्यक्ती येणे गरजेचे आहे. मतदाना संदर्भातील एव्हीएम किंवा बलेट पेपेर याविषयी चर्चा करण्यापेक्षा मतदानाऐवजी एमपीएससी, युपीएससी मूल्यांकनाद्वारे राजकारणी निवडायला हवेत. असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमल ढोबळे-साळुंखे यांनी केले.
ए.जे.सोशल वेल्फेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रस्तुत युवा संवाद २०२५ पर्व दुसरे गतिमान युगाकडे वाटचाल या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांमध्ये महिला सबलीकरण आणि कायदा तसेच सशक्तिकरण या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर मार्मिक भाष्य केले. तसेच. महाराष्ट्रातील सर्व तरुण मुला-मुलींना कायदे कशाप्रकारे बनतात व त्या कायद्यांची अंमलबजावणी कशी झाली पाहिजे यावर चर्चासत्र होणे गरजेचे असल्याचे मतही मांडले. महिलांच्यासाठी स्वतंत्र न्यायालय असले पाहिजे का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सध्या कायदेविषयक बाबींवर बोट ठेवले तसेच महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय करण्यापेक्षा ठिकठिकाणी नवीन न्यायालय सुरू करणे तसेच रेंगाळलेले दावे लवकरात लवकर निकाली काढणे गरजेचे असल्याचे
त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. महेश थोरवे होते. या महिला सबलीकरण व कायदा या चर्चासत्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या राज्यप्रवक्ता उत्कर्ष रूपवते, डॉ. माधवी घोष यांचा विशेष सहभाग होता. कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष डॉ. अबोली जिगजिणी यांनी केले होते. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील युवा वर्गाने प्रचंड प्रतिसाद दिला.
