#

Advertisement

Thursday, January 23, 2025, January 23, 2025 WIB
Last Updated 2025-01-23T12:24:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पिंपरी चिंचवडमध्ये मोठा उलटफेर ? "ते" दोघे स्वगृही परत

Advertisement

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी अजित पवारांना धक्के दिले होते. मात्र आता अजित पवारांचे शिलेदार असलेले माजी आमदार विलास लांडे आणि शहराध्यक्ष राहिलेले अजित गव्हाणे आपल्या 20 नगरसेवकांसह पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. तसे संकेत त्यांनी दिले आहेत.
पिंपरी चिंचवड शहर अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विधान सभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी अजित पवारांचे पिंपरी चिंचवड शहरातील मोहरे अचूक हेरले होते. भोसरी विधानसभा मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुरुंग लावला होता. मात्र आता पुन्हा अजित पवारांनी आपला ढासळलेला बालेकिल्ला मजबूत करायला सुरुवात केली आहे.  त्याची सुरुवात ही भोसरी विधानसभा मतदार संघातून होत आहे. अजित पवारांची साथ सोडत  शरद पवारांची साथ देणारे विलास लांडे आणि अजित गव्हाणे आगामी पालिका निवडणुकीत पुन्हा अजित पवारांच्या गोटात येण्याच्या तयारीत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित गव्हाणे आणि विलास लांडे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साथ देण्याचं ठरवलं आहे. त्याचा थेट फायदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शहरात होवू शकतो अशी चर्चा आहे. 


शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी विलास लांडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया दिली आहे.  विलास लांडे हे शहरातील जेष्ठ नेते असून ते कोणत्या अधिकृत पक्षाचे सदस्य आहेत हे सांगणं अवघड आहे.अजित गव्हाणे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विधानसभेला उमेदवारी दिली होती. त्यांनी पक्ष प्रवेशाबाबत अजून कोणतही प्रतिक्रीया दिलेली नाही.