#

Advertisement

Wednesday, February 19, 2025, February 19, 2025 WIB
Last Updated 2025-02-19T11:20:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्राच्या प्रशासनात खळबळ : 18 दिवसांत 26 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Advertisement

मुंबई : राजकाराणासह प्रशासनातही खळबळ घडामोडी घडताना दिसत आहेत. 2025 या वर्षाच्या दुसऱ्या दिवसापासून बड्या IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. 18 फेब्रुवारी 9 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.   विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात तीनदा अधिकाऱ्यांच्या बदलीची ऑर्डर काढण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 18 दिवसांत 26  अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
4 फेब्रुवारी 2025 रोजी एकाचवेळी 13  IAS अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. 11 फेब्रुवारी 2025 रोजी चार अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आले. डॉ कुणाल खेमनार, आयुक्त साखर, पुणे यांची बदली जॉइंट सीईओ एमआयडीसी, मुंबई येथे करण्यात आली आहे. डॉ मंतदा राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली यांची जॉइंट एमडी सिडको नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.  अशोक काकडे एमडी सारथी यांची जिल्हाधिकारी सांगली येथे बदली करण्यात आली आहे. अनमोल सागर सीईओ झेडपी लातूर यांची बदली मनपा आयुक्त भिवंडी निजामपूर बहुविध महामंडळात करण्यात आली आहे. तर आज म्हणजेच 18 फेब्रुवारी 2025 रोजी 9 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.  यापूर्वी  2 जानेवारी 2025 रोजी 10 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. 


18 फेब्रुवारीला बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी

  1. डॉ. विजय सुर्यवंशी (IAS:NON-SCS:2006) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  2. डॉ. राजेश देशमुख (IAS:SCS:2008) विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांना आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.
  3. नयना गुंडे (IAS:SCS:2008) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची, महिला व बाल आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  4. विमला आर. (IAS:SCS:2009) राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई यांची निवासी आयुक्त आणि सचिव, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  5. सिद्धराम सलीमठ (IAS:SCS:2011) जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  6. मिलिंदकुमार साळवे (IAS:SCS:२०१३) यांची जिल्हा परिषद, भंडारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  7. डॉ. सचिन ओंबासे (IAS:RR:२०१५) जिल्हाधिकारी, धाराशिव यांची सोलापूर महानगरपालिका, सोलापूर येथे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  8. लीना बनसोड (IAS:NON-SCS:२०१५) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांची आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
  9. राहुल कुमार मीना (IAS:RR:२०२१) प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली उपविभाग, गडचिरोली यांना लातूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.