Advertisement
महाराष्ट्र केसरी विजेत्यांना काय-काय मिळालं
अहिल्यानगर : इथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र केसरी 2025 च्या गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगली होती. यावेळी पृथ्वीराज मोहोळ यांने चांदीची गदा पटकावत विजय खेचून आणला आहे. महेंद्र गायकवाड याला चितपट करत पृथ्वीराजने बाजी मारली. तर महेंद्र गायकवाड हा उपविजेता ठरला. महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या बक्षीसाची चांगलीच चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र केसरी विजेत्याला बारा किलो चांदीची गदा आणि महिंद्रा थार ही गाडी मिळालं आहे.तर, महाराष्ट्र केसरी उपविजेत्याला महिंद्रा बोलेरो ही कार बक्षीस म्हणून आहे. विविध वजनी गटांतील विजेत्यांसाठी सुवर्णपदक आणि 18 बुलेट आहेत. तर, उपविजेत्यांना 20 स्प्लेंडर आहेत. 30 कांस्यपदक आणि सोन्याच्या अंगठ्या देखील बक्षीसांमध्ये आहेत.
