Advertisement
दिल्ली : विधानसभा निवडणुकीबाबत अॅड प्रकाश आंबेडकर यांची मागणी हायकोर्टाने मान्य केली. केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली. 2 आठवड्यात खुलासा सादर करण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत. सायंकाळी 6 नंतर निवडणूक विभागाने व्हिडीओग्राफी केली का ? असा प्रश्न ऍड आंबेडकर यांनी उपस्थित केलाय. निवडणूक आयोगाने आदर्श नियमावलीचं पालन केली नाही असे आंबेडकर म्हणाले. यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाची टक्केवारी आणि यंदा सायंकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाची टक्केवारी यात मोठा फरक असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.
