Advertisement
मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. छगन भुजबळ यांना कोणतेही मंत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे ते नाराज झाले होते. जहाँ नहीं चैंना वहाँ नहीं रहना म्हणत त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी वेगळे होण्याचेही संकेत दिले होते. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज झाले होते. “मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय नि फेकलं काय… कोणाला काय फरक पडतो. आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, परंतु हा छगन भुजबळ संपला नाही. तुम्ही मंत्रिपदावरून मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावललं त्यांना विचारायला हवं”, असे छगन भुजबळ म्हणाले होते. यानंतर ते सातत्याने वेगळी भूमिका मांडताना दिसत आहे. यानंतर त्यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. आता मात्र थेट अजित पवारांनी त्यांची नाराजी दूर केली आहे.
