#

Advertisement

Friday, February 7, 2025, February 07, 2025 WIB
Last Updated 2025-02-07T16:32:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

किती लाडक्या बहिणी अपात्र ?

Advertisement

आदिती तटकरेंनी केलं जाहीर 

मुंबई :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा 5 लाख इतका झाला आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे. तसंच पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली आहे.  
आदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे. 
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या 2 लाख 30 हजार महिला आहेत. वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिलांचा आकडा 1 लाख 10 हजार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1 लाख 60 हजार आहेत. यासह एकूण अपात्र महिलांची संख्या 5 लाख होत आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे] असंही आदिती तटकरेनी स्पष्ट केलं आहे.