Advertisement
प्रशांत मालक, उमेश मालक प्रणव परिचारक यांचे केले सांत्वन भेट
पंढरपूर : परिचारक कुटुंबाचे आधारवड म्हणजे प्रभाकर परिचारक यांचे निधन झाले. प्रभाकर परिचारक हे कुटुंब, पाहुणे, गोतावळा यांना एकत्रितपणे प्रेमाच्या नात्यात घट्ट बांधून ठेवणारे होते. साठ वर्षे घरात राजकीय सत्ता असतानाही कुठल्याही प्रकारच्या बडेजावपणाचा थाट न करता प्रत्येकाशी बोलून आपलंसं करण्याची किमया प्रभाकरावांनी साधली होती, अशा शब्दांत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी श्रद्धांजली वाहिली.
प्रशांत मालक उमेश मालक प्रणव परिचारक सांत्वन भेट लक्ष्मणराव ढोबळे यांनी घेतली. सेवाधारी या उपाधीला जागत केवळ भगवत सेवा नव्हे तर आपुलकीने लोकांची सेवा करणे हा प्रभाकरावांचा स्थायीभाव प्रेरणा देणारा होता. प्रभाकरावांचे वर्णन म्हणजे..दीर्घायुष्याचे मर्म माझ्या समजणे सोपे नव्हे....मृत्यूसही वाटे याला हातही लावू नये...अशाच प्रकारचे राहिले. मात्र, नियतीपुढे कुणाचेच काही चालत नाही. कुटुंबाचे एक मोठ छत्र हरपले. कै. ॲड. प्रभाकर परिचारक यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली.
