#

Advertisement

Thursday, February 13, 2025, February 13, 2025 WIB
Last Updated 2025-02-13T12:03:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमचे चिरंजीव पंकज कुठे गेले काय गेले….

Advertisement

भुजबळांचा तानाजी सावंतांना खोचक टोला 

मुंबई : आमचे चिरंजीव आमदार पंकज भुजबळ येवल्यातून कुठे गेले काहीच पत्ता नाही. आम्ही काल वाट बघत होतो.  आजकाल काही आमदारांचे मुलं कोण कुठे जाईल, कोण कुठे येईल काही पत्ताच लागत नाही. त्यानंतर मला कोणीतरी सांगितलं की काही नाही पंकज भुजबळ हे मंदिरात गेले आहेत म्हणून, मग मी म्हटलं काही हरकत नाही. पंकज भुजबळ कुठे नाही सापडले तरी ते मंदिरात नक्की सापडणार. आमच्या घरची मंडळी बराच वेळा इथे येतात. दरवर्षी किमान एकदा, कधी दोनदा वेळ काढून आम्ही गाणगापूरला जातो. तुळजापूर आणि पंढरपूर करूनच घरी परततो. असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.  
दरम्यान दुसरीकडे तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांच्या प्रकरणात विरोधकांकडून देखील टीका होत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. मोहोळ यांनी फोनाफोनी करून हवेतील विमान परत बोलवलं. तेच मुरलीधर मोहोळ राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता का दाखवत नाहीत? केंद्रीय राज्यमंत्री पदाची पॉवर तिथं का वापरत नाहीत? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.