Advertisement
मुंबई : आता मुंबईकरांना आता तंदूर रोटी खाता येणार नाही. कोळशाऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. तसंच, तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. आतापर्यंत 84 ढाबे, रेस्टॉरंट हॉटेलला पालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे.
ग्लोबल वार्मिंगमुळं वायू प्रदुषणाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. मुंबईतही हिवाळ्याच्या दिवसात हवेचा स्तर खालावला होता. शहरातील वायूप्रदूषण कमी व्हावे यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे कोळशावर चालणाऱ्या तंदूर भट्ट्या बंद करणाऱ्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. 8 जुलैपर्यंत कोळशावरील तंदूर भट्टी बंद करुन इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. तंदूर रोटी, चिकन हे खवय्यांचे आवडीचे पदार्थ आहेत. कोळशाच्या भट्टीत तंदूर भाजली जाते. सर्व बेकरी चालक, रेस्टॉरंट आणि धाबा चालकांना 8 जुलैपर्यंत कोळसा तंदूरभट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळं या पुढे खवय्यांना तंदूर रोटी, नान आणि चिकन खाता येणार नाहीत. पालिकेने बेकरी चालकांनादेखील नोटीस बजावली आहे.
