Advertisement
डान्सबार संदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाची चर्चा
मुंबई : राज्य सरकार डान्सबार संबंधित नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. डान्स बार कायदा सुधारणांबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत आज चर्चा करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या सूचनांनुसार कायद्यात सुधारण केल्या जाणार आहेत. येत्या अधिवेशनात नवीन सुधारणा केलेला कायदा मंजूर केला जाणार आहे. डान्सबारच्या नवीन नियमावलीत डान्सबारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही. डिस्को आणि ऑर्केस्ट्रा संदर्भात राज्य सरकारची परवानगी या संदर्भातही बदल करण्यात येणार आहे. डान्सबार संदर्भात नियम आणि कायदा करताना समितीमध्ये डान्सबार यांचा प्रतिनिधी असावा, अशा काही नियमांचा समावेश नवीन कायद्यात करण्यात येण्याची शक्यता आहे.
कोर्टाने काय अटी घालून दिल्या होत्या?
- डान्सबार फ्लोअरवर चारपेक्षा अधिक बारबाला नको.
- बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान दोन मीटरचे अंतर असावे.
- ग्राहकांना डान्स फ्लोअरवर जाता येणार नाही.
- डान्सबारमध्ये धूम्रपान करण्यास मनाई.
- बारबालांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे.
- बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.
- गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था असावी.
