Advertisement
अर्थसंकल्प अनुसूचित जाती, जमाती उद्योजकांसाठी लाभदायी
पुणे : केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्टार्टअप्ससाठी निधीची व्यवस्था सरकारच्या 10 हजार कोटी रुपयांच्या योगदानातून केली जाईल असं सांगितलं आहे. सरकार पहिल्यांदाच पाच लाख महिला, अनुसूचित जाती आणि जमाती उद्योजकांना 2 कोटींचे कर्ज देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच, आर्थिक विकास आणि समावेशक विकासावर भर देण्यात आला आहे. निर्मला सीतारामन यांनी मेडिकल कॉलेजात अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे, या घोषणा मला सर्वात महत्वाच्या वाटतात, अशी प्रतिक्रिया ऍड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांनी अर्थसंकल्पाविषयी व्यक्त केली.
ऍड. कोमलताई म्हणाल्या की, 5 वर्षात 10 हजार मेडिकलच्या जागा वाढवण्यात येणार आहेत. IITमध्ये 6500 सीटें वाढवण्यात येणार आहेत आणि 3 AI सेंटर उघडण्यात येणार आहेत. AI शिक्षणासाठी 500 कोटीचा बजेट ठेवण्यात आला आहे. देशात वैद्यकीय शिक्षणाची नेहमीच मारामार असते. अनेक तरुणांना सीट नसल्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेता येत नाही. परिणामी त्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न अर्धवट राहतं. वैद्यकीय शिक्षणाच्या जागा कमी असल्यामुळे विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहतात. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, ती मुलं खासगी मेडिकल कॉलेजात शिकतात. मात्र, गरीब कुटुंबातून आलेली मुलं वेगळ्या फिल्डला जातात. आता निर्मला सीतारामन यांनी मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी येत्या 5 वर्षात मेडिकलच्या 10 हजार जागा वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही मोठी गोष्ट ठरणार आहे. या विद्यार्थ्यांना सरकारी वैद्यकीय कॉलेजात शिक्षण मिळणार असून त्यांना प्रायव्हेट कॉलेजात पैसा खर्च करण्याची गरज पडणार नाही, असेही ऍड. कोमलताई यांनी अर्थसंकल्पाविषयी नमूद केले आहे.
