Advertisement
मुंबई : महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उत्तम गायिका असून त्यांनी स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. काही तासांपूर्वीच अमृता फडणवीस यांचं एक नवीन गाणं सोशल मीडियावर रिलीज झालं आहे. पण हे गाणं नेहमीपेक्षी थोड्या हटके अंदाजात आहे. शिवाय या गाण्यातील त्यांचा लूकही अगदी वेगळा आहे.
मिसेस मुख्यमंत्र्यांचं या नवीन गाण्याचं नाव आहे ‘मारो देव बापू सेवालाल’. त्यांनी गायलेल्या या गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून चाहत्यांकडून गाण्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गाण्यासोबत मिसेस मुख्यमंत्र्यांनी या गाण्यात जो लूक केला आहे त्याची सर्वात जास्त चर्चा होताना दिसत आहे. कारण या गाण्यासाठी अमृता फडणवीस यांनी चक्क बंजारा लूक केला आहे. या लूकमध्ये त्या अत्यंत सुंदर दिसत असून नेटकऱ्यांनीही त्यांच्या या लूकला पसंती दर्शवली आहे.
गाण्यात अमृता फडणवीसांनी बंजारा पोशाख घातलेला पाहायला मिळत आहे. टी-सीरीजच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाण्याचे गीतकार निलेश जालमकर आहे. तर संगीत दिग्दर्शन कामोद सुभाष यांनी केले आहे.
अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज होताच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. टी-सीरीजने त्यांच्या अधिकृत यु-ट्युब चॅनलवर अमृता फडणवीस यांचं ‘मारो देव बापू सेवालाल’ रिलीज केलं आहे.
