#

Advertisement

Saturday, February 8, 2025, February 08, 2025 WIB
Last Updated 2025-02-08T12:09:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

त्या' युट्यूबरचे 54 कोटी जप्त

Advertisement

मुंबई :  सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजेच 'सेबी'ने शेअर बाजार टीप्स देऊन 104 कोटींची कमाई करणाऱ्या एका महिला युट्यूबरविरोधात मोठी कारवाई केली आहे. 'सेबी'ने कारवाई केलेल्या महिलेचं नाव अस्मिता जितेंद्र पटेल असं आहे. अस्मिता यांच्यावर मोठी कारवाई करत 'सेबी'ने त्यांच्याकडील 54 कोटी रुपये जप्त केले आहे. 'सेबी'ने अस्मिता यांच्यावर बंदीही घातली आहे. 'ऑप्शन क्वीन' आणि 'शी वुल्फ ऑफ स्टॉक मार्केट' म्हणवणाऱ्या युट्यूबर अस्मिता जितेंद्र पटेल यांनी शेअर बाजार आणि ऑप्शन ट्रेडिंग टिप्सद्वारे गुंतवणूकदारांकडून 104 कोटी रुपये कमावले होते. 'सेबी'ने अस्मिता पटेल आणि त्यांच्या कंपन्यांकडून संपूर्ण 104 कोटी रुपये जप्त का करू नये याचे स्पष्टीकरण मागितले आहे.
अस्मिता पटेल यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या ग्लोबल स्कूल ऑफ ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडमधून ट्रेडिंग शिकलेल्या काही गुंतवणूकदारांनी याप्रकरणी सेबी'कडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर चौकशीदरम्यान, 'सेबी'ला असं आढळून आले की, या संस्थेने ‘लेट्स मेक इंडिया ट्रेड’, ‘मास्टर्स इन प्राइस अ‍ॅक्शन ट्रेडिंग’ आणि ‘ऑप्शन्स मल्टीप्लायर’ सारखे सशुल्क अभ्यासक्रम सुरू केले होते. मात्र, संस्था हे अभ्यासक्रम शिकवण्याच्या नावाखाली केवळ ट्रेडिंग आणि गुंतवणूक सल्ला द्यायची.