Advertisement
शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाठ यांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे. मराठी सेनेचे मोहनिश राऊळ यांनी ठाकरें बंधुंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी 30 मार्चला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर ठाकरे बंधुंसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आता या कार्यक्रमाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाठ यांनी मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. ठाकरे बंधू भाऊ एकत्र येण्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शिरसाठ यांनी, "उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र यावे असा प्रयत्न बाळासाहेब असतानाही झाला. मात्र एका हाताने टाळी वाजत नाही. आता टाळी वाजवण्यापलीकडे गेले. आता शक्य वाटत नाही," असं उत्तर दिलं.
