Advertisement
मुंबई : विधानसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील आमदारांच्या मतांच्या आधारे हे सर्व आमदार निवडले जातील. विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहाता भाजपाचे तीन आमदार निवडून येऊ शकतात.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची यादी भाजपानं दिल्लीला पाठवली आहे. यामध्ये दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. माधव भंडारी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी दीर्घकाळ पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम केले आहे.
निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेवर असलेले भाजपचे आमदार, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांच्यासह शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यासाठी 57 मतांचा कोटा लागेल सध्या परिस्थितीत विरोधी काँग्रेस शिवसेना आणि शरद पवार यांचा गट यांच्या तिघांची एकत्रित बेरीज केली तरीही 57 मत होत नसल्याने त्यांचा एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
