Advertisement
अमरावती : अचलपूर मतदार संघाचे माजी आमदार प्रहारचे नेते बच्चू कडू हे त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. आज होळीच्या दिवशीही त्यांनी विविध मागण्यांवरुन सरकारचे लक्ष वेधले. अमरावतीच्या कुरळपूर्णा येथे रस्ते रंगवत बच्चू कडूंनी सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या. आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत बच्चू कडू यांनी स्वतः रस्त्यांवर विविध मागण्यांसह चित्र रेखाटत होळीचा सण साजरा केला.
रंगपंचमी हा उत्सव आहे. मात्र त्याला आम्ही मागणीमध्ये रुपांतर केले आहे. सरकारने रंगाचे राजकारण करुन आघाडी आणि शेतकऱ्याला मुर्ख बनवण्याचे काम केले. कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता. मात्र कर्जमाफी तर नाहीच पण शेतीमालाला भाव मिळाला नाही, त्यामुळे सरकारने दुहेरी हत्याकांडकरण्याचे काम सरकारने केले आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
बच्चू कडूंच्या मागण्या?
- पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमी योजने अंतर्गत करावी.
- दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे.
- घरकुल बांधकाम करण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावे.
- शहीद परिवार व गड किल्ल्यांसाठी स्वतंत्र धोरण राबवावे.
- युवा धोरण पेपर फुटीचा कायदा मंजूर करावा.
- बांधकाम कामगाराप्रमाणे शेतमजुरांना सुद्धा योजनेचा लाभ द्यावा.
- शेतमजूर व प्रकल्पग्रस्तांसाठी वित्तीय महामंडळ निर्माण करावे.
