#

Advertisement

Monday, March 3, 2025, March 03, 2025 WIB
Last Updated 2025-03-03T12:06:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

खडसे छेडछाड : आरोपी पियुष मोरे कुणाचा कार्यकर्ता?

Advertisement

जळगाव : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीमध्ये पियुष मोरे, अनिकेत भोई,सोम माळी, अतुल पाटील, किरण माळी यांचा समावेश आहे. यातील पियुष मोरे हा शिवसेना शिंदे गटाचा आहे. तो  शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्ता आहे. तो आपला कार्यकर्ता असल्याची कबुलीही आमदार पाटील यांनी दिली आहे. तो नगरसेवकरही राहीला आहे. त्याने भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्याला या प्रकरणात गोवले गेले आहे. ज्यावेळी जत्रेत गोंधळ झाला त्यावेळी सोडवण्यासाठी म्हणून तो तिथं गेला होता. त्याला या प्रकरणात गोवण्यात आले आहे असंही पाटील म्हणाले. 
आरोपी असलेल्या पियुष मोरेने भाजपमधून  शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. तो भाजपचा नगरसेवक ही होता. तो आता माझ्या सोबत आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्याचं नाव जबरदस्तीने टाकलं गेलं आहे. पियुष मोरे हा भानगड सोडवण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याचे नाव टाकण्यात आले. तो जर दोषी असेल तर  त्यावर कारवाई करावी. पण केवळ आरोप करून कुणी दोषी होत नाही, असं ही पाटील म्हणाले. जर तो दोषी ठरला तर त्याला फाशी द्या असंही ते म्हणाले. मात्र आधी पाटील यांनी आरोपींचा आपल्याशी काही संबंध नसल्याचं आधी सांगितलं होतं. 
या घटनेंची थेट दखल आधी मुख्यमंत्र्यांनी घेतली होती.  दुर्दैवाने यात काही विशिष्ट राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी अतिशय घाणेरडे काम केलं आहे. पोलिसाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काही जणांना अटक केली आहे. उर्वरित लोकांना ही अटक होईल. परंतु त्यांनी अतिशय चुकीचं काम केलं आहे. त्यांना अजिबात माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे हे राजकीय टवाळखोर नेमके कोणत्या पक्षाचे आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याचेही उत्तर आता समोर आले आहे.