Advertisement
राष्ट्रवादीमध्ये आता वेगवान घडामोडी
मुंबई : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता मंत्रिमंडळात एक जागा रिक्त झाली आहे. या जागेवर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला आहे. मुंडेच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार का ? याची चर्चा रंगू लागली आहे. मुंडे हे ओबीसी होते. त्यामुळे त्यांच्या जागी ओबीसीनेता असावा असा मतप्रवाह आहे.
शिवाय धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न आणि नागरिपुरवठा मंत्रिपद ही भुजबळांनी भूषवलं आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे.भुजबळां सारखा नेता मंत्रिमंडळात असावा असा एक मतप्रवाह आहे. फडणवीस ही त्यासाठी अनुकूल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. भुजबळांची वर्णी लागल्यानंतर त्यांचे पुनर्वसन होणार आहे. तर ओबीसी समाजालाही प्रतिनिधीत्व मिळणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचा रोष कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच अधिवेशना होईल का याकडे इच्छुकांची नजर लागली आहे. हा निर्णय घेण्याचा अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ते कुणाची वर्णी लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
