Advertisement
मुंबई : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करीत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयाचे सहाय्य निधी देण्याची योजना आखली. विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुतीसाठी लाभदायक ठरली, साधारण 2 कोटी 11 लाख 860 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. दरम्यान महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींसाठी सरकारने गिफ्ट दिले आहे. फेब्रुवारीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांत करण्यात आलेल्या सामनी प्रक्रियेत अपात्रांच्या संख्येत भर पडली आहे. या छाननी प्रक्रियेनंतर जवळपास 2 लाख महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळं या फेब्रुवारीचा हफ्ता या महिलांच्या खात्यात येणार नसल्याचे समोर येत आहे. लाडक्या बहिणीला महिला दिना निमित्त सरकारकडून गिफ्ट देण्यात आले आहे. 8 मार्चला महिला दिनाला 2 महिन्यांचे लाडकी बहिणी योजनेचे हप्ते मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हफ्ते एकत्र देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
