#

Advertisement

Monday, March 3, 2025, March 03, 2025 WIB
Last Updated 2025-03-03T11:52:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार नाराज ?

Advertisement

मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे नाराज असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. विरोधी पक्ष लढत नाही, लोक नाराज आहेत. सात वर्ष झाले पक्षात आहे, पण मी कुठेतरी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटत असेल, असंही रोहित पवार यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे पक्षात रोहित पवार नाराज आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 
 रोहित पवार म्हणाले की, ‘पक्षाची जी बैठक झाली त्यात मी आजारी असल्यामुळे जाऊ शकलो नाही. त्यामुळे त्यात काय चर्चा झाली ते मी सांगू शकणार नाही. पण अजूनपर्यंत माझ्याकडे कोणतीही जबाबदारी आलेली नाही. पण जबाबदारी दिली नाही म्हणून मि नाराज आहे, असा अर्थ नाही. सात वर्ष मी पक्षासाठी लढत आहे, मात्र त्यात मी कमी पडत आहे, असं काही नेत्यांना वाटत असावं. पण फक्त आमदार म्हणून पक्षाचा पाठिंबा असला किंवा नसला तरी मी लोकांच्या हितासाठी लढत आलेलो आहे. शरद पवार यांचा मला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना कायम पाठिंबा राहिलेला आहे. तोच एक पाठिंबा माझ्यासाठी खूप काही आहे, असंही रोहित पवार यांनी म्हंटलं आहे.