#

Advertisement

Monday, March 3, 2025, March 03, 2025 WIB
Last Updated 2025-03-03T11:37:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर

Advertisement

मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक जाहीर करण्यात आली आहे.  विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी हा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीनंतर विधान परिषदे संख्याबळ देखील बदलणार आहे.
राज्यात नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर  परिषदेच्या 5 जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. परिषदेतील एकूण 5 आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत. यामुळे विधान परिषदेत 5 जागा रिक्त आहेत. आमशा पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड या सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेच्या या 5 रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी 10 मार्च ते 17 मार्च दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.  18 मार्च रोजी अर्जाची छाननी होणार आहे. 20 मार्चला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.  27 मार्च रोजी विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 

विधान परिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ : विधान परिषदे एकूण 78 सदस्य असतात. सध्या महायुतीचे एकूण 32 सदस्य आहेत. यापैकी भाजपचे 19 सदस्य, शिवसेनेचे 6 सदस्य तर,  राष्ट्रवादीचे 7 सदस्य आहेत. महाविकास आघाडीचे एकूण 17 सदस्य आहेत.  शरद पवार पक्षाचे 3,  काँग्रेसचे 7 तर उद्धव ठाकरे पक्षाचे 7 तर 3 अपक्ष सदस्य आहेत.  विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या  78 असली तरी विद्यमान सदस्य संख्या 52 आहे.  तर 26 सदस्यांची संख्या रिक्त आहे.