Advertisement
पीडितेने विचारलेल्या प्रश्नामुळे अधिकारी निरुत्तर
पुणे : पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात गेल्या आठवड्यात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षांच्या तरूणीवर अत्याचार करण्यात आला. आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयाने त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीही ठोठावली. दरम्यान या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित तरूणीशी संवाद साधला. मात्र , पीडितेने ‘माझ्या बदनामीला जबाबदार कोण ?’ विचारलेल्या या प्रश्नामुळे अधिकारीदेखील निरुत्तर झाले आहेत.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा तपास ताब्यात घेण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. त्याप्रमाणे तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशी संवाद साधला होता. मात्र त्यावेळी पीडित तरूणीने अधिकाऱ्यांना एकच सवाल विचारला. तो प्रश्न ऐकून तपास अधिकारी देखील निरुत्तर झाले.
चौकशी दरम्यान आरोपी दत्ता गाडेची उडवाउडवीची उत्तरं
दरम्यान स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची गुन्हे शाखेने लष्कर पोलीस ठाण्यात तीन तास कसून चौकशी केली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी चौकशी केली. मात्र, गाडे पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती समोर आली आहे. गाडेचा मुक्कम सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये आहे. या गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलिसांकडून नुकताच गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. हा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. तपासादरम्यान दत्ता गाडे याने उडवाउडवीची उत्तरं दिली.
