#

Advertisement

Friday, March 7, 2025, March 07, 2025 WIB
Last Updated 2025-03-07T12:06:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पार्ले -जी कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापे

Advertisement

मुंबई : पार्ले-जी कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. पार्ले -जी कंपनी आयटीच्या रडारवर आहे. मुंबईमध्ये या कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. पार्लेजी हा बिस्किटांचा मोठा ब्रॅण्ड आहे. मुंबईत पार्ले -जी कंपनीशी संबंधित असलेल्या ठिकाणावर अचानक पडलेल्या या छाप्यांमुळे खळबळ उडाली आहे. कर चोरी प्रकरणात  मुंबईच्या काही ऑफीसमध्ये छापेमारी सुरू आहे.
मुंबई आणि गुजरातच्या वेगवेगळ्या ऑफीसमध्ये छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पार्ले-जी कंपनीने जे काही आर्थिक व्यवहार केले आहेत, त्यामध्ये त्यांनी करचोरी केल्याचा संशय आयक विभागाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून पार्ले-जी कंपनीशी संबंधित मुंबई आणि गुजरातमधील ठिकाणावर आयकर विभागानं छापे घातले आहेत.व्हिले पार्लेमध्ये मोठं कार्यालय आहे, तिथे आयकर विभागाकडून छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबत मुंबईत इतर कारी ठिकाणी कंपनीशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. गुजरातमध्ये देखील छापेमारी सुरू आहे.