#

Advertisement

Monday, March 17, 2025, March 17, 2025 WIB
Last Updated 2025-03-17T12:14:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बरं झालं पक्ष फुटला... सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीतील खासदार सुप्रिया सुळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच पक्ष फुटला हे बरं झाल्याचं मोठं विधानही त्यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाताली राष्ट्रवादीची आढावा बैठक होती. या बैठकीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं आहे. मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला. ते या पक्षात असते आणि मी या पक्षात असते तर एक तर ते तरी राहिले असते किंवा मी तरी राहिले असते. मी त्या पक्षात काम करू शकत नाही. . सगळया दुनियेला माहीत आहे. माझी लढाई त्यांच्याबरोबर ते पक्षात असतानाही होती. मी हे कधी बाहेर बोलले नाही, पण संघटनेत आहे म्हणून बोलते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता जोरदार निशाणा साधला. 

जो पुरुष स्वत:ची जी बायको, जी आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर… एक तर तो पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करू शकणार नाही. तेव्हापासून लढाई सुरू झाली. मी आज पहिल्यांदाच ही गोष्ट बोलले. मी माईकवरही बोलेल. मी नाही कुणाला घाबरणार. मी असली फालतू लढाई करत नाही. मी विरोधी पक्षात आयुष्य घालवेल, पण नैतिकता सोडणार नाही. मला नकोय ते कंत्राटदाराचे पैसे. माझं घर काही त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पैशावर चालत नाही, असा हल्लाच  खासदार सुप्रिया सुळेनी चढवला.