Advertisement
फडणवीसांनी जाहीर भाषणात सांगितलं कारण
भिवंडी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. तिथीनुसार आज शिवजयंती असून त्यानिमित्ताने आयोजित या सोहळ्यामध्ये मंदिराच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात गाजत असलेल्या औरंगजेबच्या कबरीसंदर्भात भाष्य केलं.
औरंगजेबाच्या कबरीला भारतीय पुरातत्व खात्याने 50 वर्षापूर्वी संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे," असं फडणवीस म्हणाले. मात्र संरक्षण दिलं असलं तरी या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीच होणार नाही, असा शब्द फडणवीसांनी दिला.
12 किल्ल्यांना 'युनेस्को'मध्ये जागतिक वारसा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संगमेश्वरच्या वाड्याचा विकासाचं काम हाती घेतले आहे. छत्रपती ज्या कोठीत नजर कैदेत होते ती कोठीपण आपण विकसित करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच तुळापूर इथे देखील मोठे स्मारक आपण करत आहोत, असंही फडणवीसांनी सांगितलं. उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आहे, आग्र्याला स्मारक व्हावे म्हणून निधी दिला आहे, पानिपत इथे देखील एक स्मारक व्हावे म्हणून प्रयत्न करत आहोत, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
