#

Advertisement

Saturday, March 8, 2025, March 08, 2025 WIB
Last Updated 2025-03-08T11:18:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

धनंजय मुंडेंविरोधात सर्वात मोठा पुरावा सापडला ?

Advertisement

'जगमित्र' कार्यालय खंडणीचा अड्डा 
बीड: बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी 1400 पानांची चार्जशीट सीआयडीने दाखल केली आहे. या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे होत असून वाल्मिक कराड आणि गँगची क्रुरता समोर आली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवरही सहआरोपी करण्याची मागणी होत आहे. अशातच आता वाल्मिक कराडकडून झालेल्या खंडणीच्या मागणीबाबत सर्वात मोठा खुलासा झाला आहे. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणीच्या प्रकरणातूनच झाल्याचा मोठा आरोप सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून करण्यात आला आहे. वाल्मिक कराडने आवादा कंपनीला खंडणी मागितली आणि त्याला विरोध केल्यानेच देशमुख यांना संपवल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. अशातच आता ही खंडणी कुठून मागण्यात आली, याबाबतचा मोठा पुरावा समोर आला आहे.
वाल्मिक कराड याने धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयामधूनच आवादा कंपनीच्या मॅनेजरला खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबातून ही स्पष्ट करण्यात आले आहे. 8 ऑक्टोबर रोजी वाल्मिक कराडने जगमित्र कार्यालयामधून आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचे यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करा, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. 

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामधूनच खंडणीची मागणी झाल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांनाही संतोष देशमुखांच्या हत्येत सहआरोपी करा, अशी होत आहे. पहिल्यापासून धनंजय मुंडे हे या प्रकरणात आरोपी आहेत, असं आम्ही म्हणत आहोत. जगमित्र कार्यालयासह मुंडेंच्या सातपुडा या बंगल्यावरही खंडणीची बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना सहआरोपी करायला पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.