Advertisement
राज्यभरातील शिक्षक गणेवशात दिसणार
मालेगाव : राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. ड्रेसकोडसाठी खारीटा वाटा म्हणून शासननिधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं सुतोवाच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितल आहे. मालेगावच्या अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण करण्यात आले. यावेळी दादा भुसे बोलत होते.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत ओएनजीसी व अवंत फाऊंडेशनच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण करण्यात आले यावेळी मंत्री भुसे यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून ज्ञानार्जन करावे, पालकांनी मुलांशी संवाद साधावा आणि शाळांनी सहलींसारखे उपक्रम राबवावेत, असेही मंत्री भुसे यांनी यावेळी आवाहन केले.
