#

Advertisement

Friday, April 18, 2025, April 18, 2025 WIB
Last Updated 2025-04-18T10:57:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माजी आमदार संग्राम थोपटे "कमळ" हाती घेणार?

Advertisement

पुण्यात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का  

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. येत्या 22 तारखेला संग्राम थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
2024च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर यांनी आव्हान दिलं होतं. या निवडणुकीत शंकर मांडेकरांना 1 लाख 26 हजार 455 मतं मिळाली होती. तर संग्राम थोपटेंना 1 लाख 6 हजार 817 मतं मिळाली होती. जवळपास 19 हजार 638 मतांनी संग्राम थोपटेंचा पराभव झाला होता. संग्राम थोपटेंनी विधानसभेत विजयाची हॅटट्रिक केली. दोनवेळा मंत्रिपद हुकल्याचीही खंत त्यांच्या मनात होती. तोच राग मनात धरुण त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवन देखील फोडलं होतं. दरम्यान काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतला. आणि आता संग्राम थोपटेंनीही काँग्रेस सोडल्यास पुण्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसणार.

संग्राम थोपटेंचा राजकीय प्रवास?
सोनिया गांधींचे निकटवर्तीय अनंतराव थोपटेंचे संग्राम थोपटे पूत्र
संग्राम थोपटेंना वडिलांपासून राजकीय वारसा मिळाला
2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले
2009 मध्ये भोर मतदारसंघातून विजय मिळवत पहिल्यांदा संग्राम थोपटे आमदार झाले
त्यानंतर 2014 आणि 2019च्या विधानसभेत विजय मिळवत संग्राम थोपटेंनी हॅटट्रिक केली
विधानसभेत विजयाची हॅटट्रिक केलेल्या संग्राम थोपटेंना 2024मध्ये पराभव स्वीकारावा लागला.