#

Advertisement

Thursday, April 10, 2025, April 10, 2025 WIB
Last Updated 2025-04-10T10:51:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका

Advertisement

 करुणाशी असलेले संबंध लग्नासारखेच 
मुंबई : करुणा मुंडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे 'लग्नासारखे'च असल्याचं निरिक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवलं आहे. दोघांनी 2 मुलांना जन्म दिला. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असं धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवत म्हटलं आहे. करुणा मुंडेंना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिले होते. 
धनंजय मुंडेंनी केलेल्या याचिकेमध्ये त्यांनी, आपण करुणा शर्मा यांच्याशी लग्न केलं नसल्याचा दावा केला होता. धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरुपाचे आहेत. त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत, असं सत्र न्यायालयाने म्हटलं आहे. करुणा शर्मा यांच्याबरोबर मी 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये होतो. त्यांच्याशी विवाह केलेला नाही. राजश्री मुंडे हीच माझी पहिली पत्नी आहे, असा दावा धनंजय मुंडे यांनी अपिलात केला होता. परंतु अतिरिक्त सत्र न्यायालयाने मुंडे यांचा दावा फेटाळल्याचे स्पष्ट झाले आहे. एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच आहे. करुणा व त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.