Advertisement
दिल्ली : काश्मीरची भूमी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यामुळे हादरली आहे. पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यामुळं संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 10 दहशतवाद्यांनी पहलगाम येथे आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झाले आहे तर पंतप्रधान मोदी सौदी दौरा अर्धवट सोडून दिल्लीत दाखल झाले आहेत. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचाही समावेश आहे.
पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक अडकले आहेत. आम्हाला महाराष्ट्रात सुरक्षित न्या, अशी मागणी पर्यटकाकंडून केली जाते. या पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.