Advertisement
सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत जीवन संपवले. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अज्ञात कारणावरुन शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमारास स्वतःच्या घरात असताना डोक्यात गोळी झाडून घेतली. यानंतर गोळीचा आवाज येताच बेशुद्धवस्थेत असलेल्या डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत गंभीररित्या जखमी असल्यानं यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोसर्जन होते. फक्त सोलापूर, महाराष्ट्रचं नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात त्यांनी वैद्यकीय सेवा बजावली आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊले का उचलले याचं कारण अद्याप समोर आले नाही. ज्या हॉस्पिटलमध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्यांच्या त्याचं रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
वैद्यकिय क्षेत्रात नामवंत न्युरोसर्जन अशी डॉ. शिरीष वळसंगकर यांची ओळख. ते सोलापुरातील पहिले न्युरोलॉजिस्ट असून, मेंदूवरील विविध आणि अत्याधुनिक उपचारांसाठी त्यांनी इथं अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असं रुग्णालय सुरू केलं होतं. न्यूरोलॉजी क्षेत्रात त्यांनी दिलेलं भरीव योगदान अनेकांना जगण्याची नवी उर्जा देणारं ठरले.