Advertisement
मुंबई : राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. त्यामुळं गावागावात टॅंकरनं पाणीपुरवठा केला जात असल्याचं चित्र आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 1 हजार 384 गावं आणि वाड्यांवर 478 टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत. गेल्या आठवड्यात हा आकडा 223 होता, मात्र आठवडाभरात हा आकडा अडीचशेपेक्षा जास्त झाला आहे.सध्याच्या परिस्थितीला अर्ध्या महाराष्ट्राची तहान टँकरवर भागवण्याची वेळ आली आहे.
उन्हाचा पारा वाढत असल्यानं अनेक छोट्या-मोठ्या तलावांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी होत आहे. तर ग्रामीण भागांमधील विहिरी आणि बोरवेलचं पाणीदेखील आटलंय.त्यामुळं अनेक भागात पिण्यासाठी पाणीच नसल्यानं टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतोय.अजून एप्रिल महिना संपायचा बाकी आहे. मे महिन्यात हे पाणीसंकट आणखी रौद्ररुप धारण करू शकते. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना होणे आवश्यक आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती टॅंकर?
ठाणे - 36, रायगड -21, पालघर- 17, नाशिक- 22, अहिल्यानगर- 56, पुणे- 31, सातारा- 55, सांगली- 02, सोलापूर- 05, छत्रपती संभाजीनगर- 135, जालना- 46, नांदेड- 02, अमरावती- 12, वाशिम- 01, बुलढाणा- 28, यवतमाळ- 08