Advertisement
महिलांची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली
पुणे : महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाड्यात आलेल्या उदयनराजेंनी केलेलं वक्तव्य वादात अडकलं आहे. थोरले प्रतापसिंह महाराजांकडून महिलांची पहिली शाळा सुरु करण्यात आली असा दावा उदयनराजेंनी केला आहे.
एका दृष्टीकोनातून आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं. सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केलीअसेल तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. तीदेखील स्वत:च्या राजवाड्यात सुरु केली. त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झालं, असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.
उदयनराजे यांच्या यांच्या या वक्तव्याचा समाचार ओबीसी नेते मंगेश ससाने यांनी घेतला आहे. जे सातारचे महाराज आहेत त्यांना महात्मा फुले यांनी 1 जानेवारी 1948 साली भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली यावरही आक्षेप आहे. एक नवा शोध उदयनराजे यांच्या माध्यमातून लागत आहे. यासाठी सगळे इतिहासतज्ज्ञ, संशोधक त्यांच्यासमोर फेल ठरले आहेत. उदयनराजे यांनी जो गौप्यस्फोट केला आहे हा महाराष्ट्राचा सामाजिक, शैक्षणिक क्रांतीचा इतिहास आहे त्याला धक्का देणारा आहे, असं ते उपहासात्मकपणे म्हणाले आहेत.
