#

Advertisement

Friday, April 11, 2025, April 11, 2025 WIB
Last Updated 2025-04-11T11:32:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ॲड. कोमलताईंच्या वाढदिनी ‘चेक अँड मेट चषक’ स्पर्धा

Advertisement

मानांकित खेळाडूंची विजयी सलामी

सोलापूर : ॲड. कोमल अजय साळुंखे–ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय व  सोलापुर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजीत केलेल्या ‘चेक अँड मेट चषक’  खुल्या तसेच  ९ व ७ वर्षाखालील मुले व मुलींच्या जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत मानांकित खेळाडूंनी विजयी सलामी दिली. नी 

सोलापूरचा आंतरराष्ट्रीय कॅंडिडेट मास्टर श्रेयांस शहा, विजय पंगुडवाले, विशाल पटवर्धन, बार्शीचा शंकर साळुंके, बीएसएनएलचा राष्ट्रीय खेळाडू चंद्रशेखर बसरगीकर, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त पवन राठी, प्रसन्ना जगदाळे, सागर गांधी, उस्मानाबादचे ज्येष्ठ खेळाडू नंदकुमार सुरू, साईराज घोडके, वेदांत मुसळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे, सृष्टी गायकवाड, हिमांशु व्हानगावडे यांच्यासह २७ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी विजयी सलामी दिली.
जुळे सोलापूर येथील मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सुरु असलेल्या या स्पर्धेत सोलापुर शहरासह माळशिरस, करमाळा, पंढरपुर, मंगळवेढा, बार्शी, अक्कलकोट, माढा तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील १७६ खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. ९ वर्षाखालील गटात नैतिक होटकर, आदित्य जंगवाली, अद्विक ठोंबरे, आरुष माने, अन्वी बिटला, तन्वी बागेवाडी, ईशा पटवर्धन या उदयोन्मुख खेळाडूदेखील उत्कृष्ट खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. 
स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वासंती पांढरे यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाली. अध्यक्षीय मनोगतात आयुक्त कारंजे यांनी खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी हार व जीत यापेक्षा जिद्द व चिकाटी महत्त्वाचे असल्याबाबत सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे, रोहिणी तुम्मा, प्रशांत पिसे, यश इंगळे तसेच तसेच महाविद्यालयातील सर्व स्टाफसह प्रा. गुरव डी. एफ., प्रा. हेडे एस. एस., प्रा. जाधव आर. बी, प्रा. माने व्ही. एल, प्रा. कोळी आर. पी, ग्रंथपाल साळुंखे आर. एम व लिपिक धसाडे आर. ए. शिंदे अमर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी तर आभार प्राचार्य डॉ. वासंती पांढरे यांनी मानले