Advertisement
अमरावती : उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री असलेल्या अजित पवारांवर बच्चू कडू यांनी जोरदार टिका केली आहे. दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या मानधनात नाममात्र वाढ होते. पण त्याच अजित पवारांच्या पगारात गेल्या पंधरा वर्षात किती वाढ झाली आहे, असा प्रश्न माजी आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. शिवाय त्यांनी अजित पवारांचा वाढलेला पगारच सर्वां समोर सांगितला आहे. अजित पवारांचा पगार 2010 मध्ये 55,000 होता. आता अजित पवारांचा हाच पगार अडीच लाख रुपये आहे. 2010 मध्ये 55 हजार पगार असणारे अजित दादा अडीच लाख रुपये पगार घेतात. तर दुसरीकडे सहाशे रुपये मिळणाऱ्या दिव्यांगांना फक्त पंधराशे रुपये वाढवतात, लाज वाटली पाहिजे अशा शब्दात बच्चू कडूंनी टिकेच झोड उठवली आहे.
अर्थभेद कसा केला जातो या विरोधात मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानुसार 2 जूनला पहिली सभा अजित पवार यांच्या घरा बाहेर घेतली जाणार आहे. तिथे अर्थभेद नावाचं व्याख्यान करून, अर्थभेद कसा केला जातो, बजेटमध्ये आम्हाला कसं मारलं जातं, हे अजित पवारांच्या गावात जाऊन आम्ही सांगणार आहोत, असं कडू म्हणाले. त्यानंतर पंकजाताई मुंडे, बाळासाहेब पाटील, संजय राठोड यांच्या घरासमोर ही असेच आंदोलन केले जाईल. या आंदोलनाचा भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर जाऊन मुक्काम करणार असल्याचं ही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणसांनी सांगितलं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही. चार महिने झाले अजित पवार म्हणतात पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाहीत. एकनाथ शिंदे यांचे तर आता कामचं राहिले नाही. वेळ आली तर भगतसिंगसारखी लढाई लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
