#

Advertisement

Monday, May 12, 2025, May 12, 2025 WIB
Last Updated 2025-05-12T17:31:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित, यापुढे...

Advertisement

मोदींचे पाकिस्तानला पाच  इशारे
दिल्ली : देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुढे दहशतवादाविरोधात अशीच कडक पाऊले उचलली जातील असा थेट इशारा दिला. त्यासोबतच त्यांनी पाकिस्तानला पाच मोठे इशारेही दिले.  आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादी आणि सैनिकी ठिकाणांवर उत्तरादाखल केलेल्या कारवाईला स्थगित केले आहे. येत्या काही दिवसांत पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून भारताचे सैन्य सतर्क आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर ऑपरेशन सिंदूर हे भारताचे दहशतवादाविरोधातील धोरण आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्ता ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित झाले आहे, असा थेट इशारा दिला. 

पाकिस्तानला दिला सज्जड दम!
1.यापुढे जर पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती दहशतवादावरच होईल. जर पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती पीओकेवरच होईल.
2. पाकिस्तान काय भूमिका घेतो ते येत्या काळात दिसेल. तिन्ही भारतीय सैन्य आणि बीएसएफ सतर्क आहेत. 
3. सर्जिकल आणि एअर स्ट्राइकनंतर, ऑपरेशन हे दहशतवादाविरुद्ध भारताचे धोरण आहे. जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल.
4. आम्ही आमच्या स्वतःच्या अटींवर ठाम राहू. दहशतवादाची मुळे उफाळून येतील तिथे आम्ही कारवाई करू.
5. भारत कोणताही अणू बाँबची ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. भारत अचूकता आणि निर्णायकतेने प्रहार करेल.
6. आपण दहशतवादाला आश्रय देणारे सरकार आणि दहशतवादाचे सूत्रधार यांना वेगळे पाहणार नाही.

दरम्यान, कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाविरोधात आपल्या सगळ्यांचे एकत्र राहणे गरजेचे आहे. एकता ही आपली मोठी शक्ति आहे. हे युग युद्धाचे नाही मात्र हे युग दहशतवादाचेही नाही. दहशतवादाविरोधात झिरो टॉलरेन्स हे उत्तम जगाची गॅरेंटी आहे. पाकिस्तानी सैन्य, सरकार ज्या रितीने दहशतवादाला पोसत आहे, ते पाहाता दहशतवादच पाकिस्तानला गिळून टाकेल. पाकिस्तानला वाचायचे असेल तर दहशतवादी ढाचा पाडावा लागेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.