Advertisement
मुंबई : दहावी परीक्षेचा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 1.71 टक्क्यांनी कमी झाला आहे. राज्यातील एकूण 49 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. यामध्ये लातूरच्या शाळांची संख्या सर्वाधिक 10 आहेत. त्याशिवाय शून्य टक्के निकाल लागणाऱ्यांमधील शाळांत पुणे 7, नागपूर 8, संभाजीनगर 9, मुंबई 5, कोल्हापूर 1, अमरावती 4, नाशिक 4, लातूर 10, कोकण 1 शाळांचा समावेश आहे. या शाळेतील दहावीचा एकही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकला नाही. लातूर विभागातील १० शाळांचा निकाल शून्य टक्के लागला असून कोल्हापूर आणि कोकण या विभागातील एक-एक शाळाचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
49 शाळांमध्ये 0 टक्के निकाल
पुणे ७ शाळा
नागपूर ८ शाळा
छत्रपती संभाजीनगर ९ शाळा
मुंबई ५ शाळा
कोल्हापूर १ शाळा
अमरावती ४ शाळा
नाशिक ४ शाळा
लातूर १० शाळा
कोकण १ शाळा