#

Advertisement

Wednesday, May 21, 2025, May 21, 2025 WIB
Last Updated 2025-05-21T11:24:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

54 तोळं सोनं, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी....

Advertisement

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे 

पुणे :  बावधनमध्ये सुनेच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे अजूनही फरार असल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. लग्नावेळी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी अन् चांदीची भांडी देण्यात आली होती. तरी जमीन खरेदीसाठी 2 कोटींच्या मागणीचा तगादा लावला होता. इतकंच नाही तर पती शशांक हा चारित्र्यावरून संशय घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुण्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हागवणे यांची सून वैष्णवी हिने 16 मे रोजी आत्महत्या केली. वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील हगवणे आणि नणंद  करिश्मा यांच्या विरोधात हत्येचा आरोप करत बावधन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मात्र राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष आहेत, त्यामुळंच सून वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी त्यांना अटक होत नाही. या चर्चेत तथ्य नाही असं म्हटलं आहे. पोलिसांची तीन पथकं त्यांच्या शोधात असल्याचा दावा बावधन पोलिसांनी केला आहे. वैष्णवीची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.