#

Advertisement

Wednesday, May 21, 2025, May 21, 2025 WIB
Last Updated 2025-05-21T11:17:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या सूनेची आत्महत्या

Advertisement

सासू आणि नणंदेला अटक 

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता राजेंद्र हगवणे यांच्या सूनने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष आहेत. शुक्रवारी 33 वर्षीय वैष्णवीने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती शशांक, नणंद आणि दिरावर गुन्हा दाखल आहे. त्यांच्यापैकी पती शशांक, सासू आणि नणंदेला अटक करण्यात आली आहे. तर सासरे राजेंद्र आणि दिराचा शोध सुरु आहे. 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर खळबळ माजली आहे. वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. वैष्णवीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, सासरचे लोक हुंड्याची मागणी करत मुलीचा सतत मानसिक आणि शारिरीक छळ करत होते. तिच्या शरिरावर मारहाणीच्या खुणा आहेत.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधान पोलीस ठाण्यात छळ आणि आत्महत्येसाठी प्रवृत्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी, वैष्णवीने 16 मे रोजी स्वत:ला खोलीत बंद करुन घेतलं होतं. काही वेळाने पती शशांकने दरवाजा ठोठावला. आतून काहीच उत्तर न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. यानंतर तिने आत्महत्या केल्याचं उघड झालं. वैष्णवीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं. 

वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचालकांना निष्पक्ष व वेळेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना तत्काळ अटक करावी, असेही निर्देश दिले असून, तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याबाबत हगवणे कुटुंबीयांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.