#

Advertisement

Monday, May 5, 2025, May 05, 2025 WIB
Last Updated 2025-05-05T11:29:16Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बापाची निर्घृण हत्या : वैभवी देशमुखला बारावीच्या परीक्षेत 85.33 टक्के गुण

Advertisement

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. ज्या पद्धतीने ही हत्या करण्यात आली हे पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. याप्रकरणी वाल्मिक कराड आणि टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील न्यायालयीन प्रक्रीया सुरु आहे. वडीलांची हत्या झाली त्याच काळात बारावीची परीक्षा होती. घरावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना संतोष देशमुखांची लेक वैभवीने परीक्षा दिली होती. आज बारावीचा निकाल समोर आला. त्यात वैभवी संतोष देशमुख यांच्या निकालाचेही कौतुक होत आहे. 

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची लेक बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. नुसती उत्तीर्णच नव्हे तर तिला तब्बल 85.33 टक्के इतके गुण मिळाले आहेत. निकाल असल्याने वैभवी वडिलांच्या आठवणीने भावुक झालेली दिसली. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला आज माझे वडील नाही, याचं दु:ख होतं, अशी प्रतिक्रिया वैभवीने दिली. माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच लागल्याची भावना देखील यावेळी तीने व्यक्त केली. परीक्षेच्या निकालाच्या आनंदापेक्षा वडिलांचे दुःख मोठं. यापुढेही न्यायाची लढाई सुरूच राहणार, अशी प्रतिक्रिया वैभवी देशमुखने दिली.  परीक्षा देण्याची मानसिकता नव्हती. मी स्वतःच्या पायावर उभे रहावे असं वडिलांचे स्वप्न होतं. या घटनेनंतर माझं आयुष्यच बदलून गेलं. दुःखाचा डोंगर कोसळला. विचार बदलले. पूर्वी करिअरचा विचार करायचे. मला डॉक्टर व्हायचं होतं, असेही ती म्हणाली. संतोष देशमुख खून खटल्याचं प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावं, अशी मागणी तिने केली आहे.