Advertisement
कोकण विभागाचा निकाल सर्वाधीक
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल आज ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 94.58 टक्के इतकी असून मुलांची 89.51 टक्केवारी इतकी आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 5.07 टक्क्यांहून अधिक आहे.
कोकण विभागाचा निकाल सर्वाधीक लागला असून 96.74 टक्के इतका आहे. तर, सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा असून 89.46 टक्के इतका आहे. या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण 14 लाख 87,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 13 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 91.86 इतकी आहे.
नऊ विभागीय मंडळातील एकूण निकाल : पुणे 91.32 ,नागपूर 90.52, छत्रपती संभाजीनगर 92.24, मुंबई 92.24, कोल्हापूर 93.63, अमरावती 91.43, नाशिक 91.31, लातूर 89.43, कोकण 96.74. फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल 93.37% होता. फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के आहे. निकालाचा टक्का 1.49 ने यंदा कमी झाला आहे. मागील वर्षांपेक्षा या वर्षीचा निकाल 1.49 टक्क्यांनी घसरला आहे.
बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. निकाल कुठे व कसा पाहता येईल हे सर्व लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनमुल्यांकनासाठी mahahsscboard in या संकेतस्थळाद्वारे 6 ते 20 मे या कालावधीत स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाइन कर्ज करण्याची सोय आहे. उत्तरपत्रिकेच्या पुनमूल्यांकनासाठी अधिकृत संकेतस्थळावरुन अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.
