#

Advertisement

Friday, May 9, 2025, May 09, 2025 WIB
Last Updated 2025-05-09T12:39:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

एअर स्ट्राईक नेहमी रात्रीच का होतात ?

Advertisement


दिल्ली : भारतानं पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर रात्री एअर स्ट्राईक केला. रात्रीच्या वेळी पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या तीन राज्यांमध्ये जम्मू काश्मीर, राजस्थान आणि पंजाबमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला, मात्र भारताच्या डिफेंस यंत्रणेनं हा हल्ला यशस्विरित्या परतून लावला आहे, पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर अपटला आहे. मात्र आता असा प्रश्न निर्माण होतो की, एअर स्ट्राईक हे नेहमी रात्रीच का होतात?
एअर स्ट्राईक रात्रीच केले जातात त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे रात्रीच्या वेळी शत्रू हवा तेवढा सतर्क नसतो, त्यामुळे लक्ष्यभेद करायला अनुकूल परिस्थिती असते. तसेच रात्री दृष्यमानता कमी असते, त्यामुळे शत्रूच्या डिफेंस यंत्रणेला हल्ला नेमका कुठून सुरू आहे, याचा अचूक अंदाज लवकर येत नाही, तसेच रात्रीच्या वेळी एअर ट्राफिक देखील खूप कमी असते, त्यामुळे कोणताही अडथळा न येता असे हल्ले करता येतात, त्यामुळे एअर स्ट्राईक हे नेहमी रात्रीच्या वेळीच होतात. रात्री जेव्हा एअर स्ट्राईक होतो, तेव्हा अधिक अचूक लक्ष्यभेद करता येतो. रात्रीच्या वेळी शत्रू  गाफील असतात, याचा फायदा होतो.