Advertisement
दिल्ली : कराची पासून ते अगदी इस्लामाबादपर्यंत पाकिस्तान भारताच्या कारवाईने हादरले आहेत. या जोरदार कारवाईमुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची झोप उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिम भारताच्या एअर स्ट्राईकमुळे घाबरून कराची सोडून पळून गेला आहे. दाऊद इब्राहिम सोबत त्याचे साथीदार अनीस आणि छोटा शकील यांनीही कराची सोडले आहे.
कराचीतून दाऊद इब्राहिमला बाहेर काढण्या मागे आयएसआय असल्याचं ही म्हटलं जात आहे. त्याला पाकिस्तानमध्येच दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहितीही सुत्रांकडून मिळत आहे. दाऊचं संपूर्ण परिवार या हल्ल्यामुळे घाबरला आहे. त्यात पत्नी महजबीन, मुलगा मोईन, त्याचा छोटा भाऊ अनिस इब्राहीम, दाऊदचा डावा हात छोटा शकील यांच्यासह त्याने कराची सोडले आहे. शिवाय दाऊदचा खास शुटर मुन्ना झिंगाडा ही दाऊद बरोबर आहे. याच मुन्नाने छोटा राजनवर बँकॉकमध्ये हल्ला केला होता. भारताने केलेल्या आक्रमक कारवाईमुळे पाकिस्तानात असलेल्या दाऊदच्या पायाखालची वाळू सरकली. सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी त्याची धावपळ उडाली.
