#

Advertisement

Monday, May 12, 2025, May 12, 2025 WIB
Last Updated 2025-05-12T11:56:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमचा लढा दहशतवादाविरोधात होता !

Advertisement


एअर मार्शल ए.के. भारतींनी जगासमोर आणलं सत्य 
दिल्ली :आमचा लढा दहशतादाविरोधात होता, पण पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना साथ देणं योग्य समजलं आणि या लढाईला आपली लढाई केली असं सांगत एअर मार्शल एके भारतींनी पाकिस्तानचा चेहरा जगासमोर उघड केला आहे. तिन्ही सैन्य दलाकडून पत्रकार परिषद घेत पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी प्रत्युत्तर कारवाई करणं गरजेचं होतं. जे नुकसान झालं त्यासाठी पाकिस्तानी लष्करच जबाबदार आहे असंही त्यांनी सांगितलं. 
भारतीय सैन्य दलाकडून पत्रकार परिषद घेत 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात सध्या असणारी स्थिती आणि पाकिस्तानवर करण्यात आलेली माहिती देण्यात आली. ते म्हणाले की, आम्ही दहशतवादाविरोधात कारवाई केली. भारताची सुरक्षा यंत्रणा भेदणं अशक्य आहे. पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या चिनी मिसाईल्सपण अपयशी ठरल्या आहेत.