#

Advertisement

Monday, May 12, 2025, May 12, 2025 WIB
Last Updated 2025-05-12T12:03:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ऑपरेशन सिंदूरच्या PC मधे विराट कोहलीचा उल्लेख

Advertisement

दिल्ली : सैन्य दलांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत पाकिस्तानवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. भारताची सुरक्षा यंत्रणा भेदणं पाकिस्तानसाठी अशक्य असल्याचं यावेळी डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितलं. हे सांगताना त्यांनी 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्याचा किस्सा सांगितला. तसंच निवृत्ती जाहीर करणाऱ्या विराट कोहलीचाही उल्लेख केला.
"आपल्या एअरफील्ड्स आणि लॉजिस्टिक्सला लक्ष्य करणे खूप कठीण आहे. विराट कोहलीने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तो माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील सामन्यादरम्यान, दोन ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेफ थॉमसन आणि डेनिस लिली यांनी इंग्लंडच्या फलंदाजीची लाइनअप उद्ध्वस्त केली. नंतर ऑस्ट्रेलियाने एक म्हण रचली होती की - "अॅशेस टू अॅशेस, डस्ट टू डस्ट, जर थॉमस नसेल तर लिली नक्कीच असेल." जर तुम्ही लेअर पाहिल्या तर तुम्हाला मी काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे ते समजेल. जरी तुम्ही सर्व लेअर ओलांडल्या तरी या ग्रिड सिस्टमचा एक थर तुमच्यावर नक्कीच परिणाम करेल," असं डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितलं.


लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, "ड्रोन आणि शस्त्रं नष्ट करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि उर्वरित ड्रोन पाडण्यात आले. मला बीएसएफचेही कौतुक करायचे आहे. गस्त घालणारे जवान आमच्या मोहीमेत सहभागी झाले आणि शौर्य दाखवत आम्हाला साथ दिली.यामुळे पाकिस्तानच्या नापाक कारवाया उद्ध्वस्त झाल्या".