Advertisement
मुंबई : राष्ट्रवादीत सध्या विलीनीकरणाचे वारे सुरु आहेत का ? असा सवाल सध्या चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी (SP) पक्षातील एक गट अजित पवारांसोबत जाणार का अशी चर्चा सुरु आहे. याला निमित्त ठरलंय शरद पवारांनी केलेले मोठं वक्तव्य. इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हे वक्तव्य केले आहे.
आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतंय असं वक्तव्य शरद पवारांनी केल आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी याबाबत माहिती दिली आहे. इंडिया आघाडीच्या सद्य स्थितीवरही पवारांनी भाष्य केल आहे. संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावं] असं सूचक वक्तव्य पवारांनी या मुलाखतीत केल आहे. पवारांच्या या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे वारे सुरु झाले आहे. का अशा चर्चा रंगल्या आहेत.
अनेक दिवसांपासून दोन्ही पवार एकत्र येणार का असा सवाल उपस्थित केला जात होता. त्याला कारणही तसंच होतं. अनेक कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. शरद पवार आणि अजित पवार हे वेगवेगळ्या साखर कारखान्यांच्या बैठकांना उपस्थित होते. काही वेळाला त्यांच्यात गुप्त बैठकादेखील झाल्या होत्या. तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात देखील आला होता. मात्र आता स्वतः शरद पवारांनीच यावर भाष्य केले आहे. त्यामुळं राजकारणात पुन्हा काही मोठं घडणार का याची शक्यता वर्तवण्यात येतेय. शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
