#

Advertisement

Wednesday, May 14, 2025, May 14, 2025 WIB
Last Updated 2025-05-14T11:53:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता अजित पवारांनी फेटाळली

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला राम राम करण्याची हालचाल सुरू असेल म्हणूनच शरद पवारांकडून पक्ष एकत्रीकरणाबाबतचे सुतोवाच केले असतील,’ असं अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीमध्ये म्हटलं आहे.
मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत अजित पवारांनी आमदारांना मार्गदर्शन करताना हे विधान केलं आहे. सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही, असंही अजित पवारांनी आमदारांना स्पष्टपणे सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती लागण्याची शक्यता असल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली जात असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. आगामी काळातील पक्षातील गळती थांबवण्याच्या अनुषंगाने शरद पवारांकडून वक्तव्य आली असतील अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
दरम्यान, एका मुलाखतीदरम्यानच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं की नाही याचा निर्णय पुढच्या पिढीने घ्यावा, मी त्या निर्णय प्रक्रियेत नाही असं पवार म्हणाले होते. तेव्हापासूनच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा रंगू लागली आहे. अगदी अजित पवार सुप्रिया सुळे एकत्र येण्याचा निर्णय घेण्यापासून दोन्ही बाजूकडील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी घेतलेली वेट अॅण्ड वॉचची भूमिका अशा बऱ्याच बातम्या समोर आल्यानंतर शरद पवार यांनी केलेल्या विधानावर पहिल्यांदाच अजित पवार बोलल्याचं पाहायला मिळालं आहे.